Saturday, November 12, 2022

संविधान सभागृह निर्मितीसाठी ग्राम पंचायतींनी पुढाकार घ्यावा- कास्ट्राईब




माजलगाव ( प्रतिनिधी ) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदानात वाढ करणे तसेच संविधान सभागृहाचे बांधकाम करणे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभाग शासन निर्णय क्रमांक:संकिर्ण-२०२१/प्र.क्र.७९/ दि.६ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन निर्णय काढून,राज्यातील ज्या ग्रामपंचायती अंतर्गत, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची लोकसंख्या ५०० च्या वर आहे अशा गावांमध्ये संविधान सभागृह बांधण्यासाठी सुमारे ४० लक्ष रुपये पर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात येणार असून त्यासाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे सुचित केले आहे. तेंव्हा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी संविधान सभागृह निर्मितीसाठीचे परीपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन महा. राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
संविधान सभागृह बांधण्यासाठीचे प्रस्ताव, तालुका गटविकास अधिकारी व जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. जिल्हा विकास व नियोजन समितीच्या मान्यतेवरुन सदरील प्रस्ताव शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवले जातील.
ग्रामपंचायतींना सदर संविधान सभागृह इमारत मंजुरीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे व प्रस्ताव सादर करणे या शासन निर्णयानुसार बंधनकारक केलेले आहे. मात्र या शासन निर्णयाला आज जवळपास एक वर्षाचा कालावधी ओलांडून गेला असतांनासुद्धा ग्रामपंचायत पातळीवरुन यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात आले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच या योजनेसाठी पंचायत समिती कार्यालयाकडुन सुद्धा म्हणाव्या तशा सुचना ग्रामपंचायतींना दिलेल्या नाहीत. तेंव्हा, अनुसुचित जाती व नवबौद्ध समाज घटकां बरोबच भारतातील सर्व नागरिकां पर्यंत विश्व भुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचवणे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अभ्यासिका सुरू करणे, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामिण भागात पोहचणे यासाठी ग्रंथालय व अभ्यासिका अद्ययावत होणेस्तव, जिल्ह्यातील पात्र गावांचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी फार मोठ्या प्रमाणात सादर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे महासंघाचे जिल्हा संघटन प्रमुख भारतभाऊ टाकणखार, जिल्हा उपाध्यक्ष वसंतभाऊ टाकणखार ता. सचिव अभिमन्यू ईबिते, तालुकाध्यक्ष राहुल टाकणखार, किरण शिंदे, निलेश गावडे, रणजित राठोड, अजिमोद्दीन खतीब, नारायण भाळशंकर, धोंडीराम रामुळे, शेख जहिर, जिवन डोंगरे, राजकुमार सोनवणे, कृष्णा हौसरमल, नागनाथ पडलवार, विश्वनाथ बेद्रे, अविनाश येळंबकर, सय्यद आयुब, शिवाजी भाळशंकर, किरण माने, हनुमंत पांढरपोटे, प्रविण जाधव, शेख आसद, अमोल राऊत, सुमेध घाडगे, शिवाजी व्यवहारे, नितीन पुटवाड, रवि आदमाने, विजय वैरागे, राहुल खुणे, राजेंद्र सातपुते, शंकर पवार, शेख मतीन, अनिल गावित, गोविंद पवार, बळीराम घणघाव आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment