*एकाच रात्रीत जुना मोंढा येथील तीन दुकाने फोडली.


*जवळपास लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास.
माजलगाव (प्रतिनिधी) माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या नेतृत्वात चोरांचे राज्य वाढत असून एकाच रात्री मध्ये जुना मोंढा भागातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी जवळपास लाख रुपयाचा माल लंपास केला. माजलगाव शहरांमध्ये चोऱ्यांचे सत्र थांबत नसून चोर पोलिसांच्या खेळामध्ये चोरच सरस ठरत असून पोलीस मात्र चोरांना पकडण्यास निष्क्रिय ठरत आहेत. नेमके शहर पोलीस करतात तरी काय असा प्रश्न व्यापारी बांधवातून उपस्थित करण्यात येत आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की,शहरातील जुन्या मोंढ्यात भागा असणाऱ्या मुंदडा मशिनरी, बजरंग हार्डवेअर, वांगीकर मशिनरी ही दुकाने शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून फोडत चोरी करत पोलीस निरीक्षक धनंजय फराटे आणि शहर पोलिसांचा नाकर्तेपणा शहरावासिया समोर आला आहे. शुक्रवारी पहाटेच्या वेळेला सदरील घटना घडली असल्याचे बोलले जात असून या तीन दुकानातून जवळपास लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास झाला आहे. नेमके शहर पोलीस करतात तरी काय? असा सवाल नागरिक, व्यापारी उपस्थित करत असून शहर पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे व ढिसाळ, कामचुकार पणा मुळे शहरात चोऱ्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढच होत असून यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धनंजय फराटे यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी असे व्यापारी वार्गातून मागणी होत आहे. चोऱ्यांच्या सत्रात वाढ होत असून देखील पोलीस हे सुस्त असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असून सदरील घटनेचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती.
No comments:
Post a Comment