Friday, November 11, 2022

दहशत आणि भयाचा सामना करण्यासाठी माझी भारत जोडो यात्रा - राहुल गांधीं


नांदेड  (प्रतिनिधी) पंतप्रधान मोदींच्या कार्यप्रणालीवर भारतातील जनता नाराज असून मोदींनी भारतामध्ये महागाई बेरोजगारी दहशत आणि भय वाढवले आहे, त्यामुळे मी भारत जोडो यात्रा करून या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे राहुल गांधी यांनी नांदेड येथे दि.10 नोव्हेंबर रोजी केले ते भारत जोडो यात्रेदरम्यान नवा मोंढा येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते.
       मंचावर सुप्रिया सुळे अशोक चव्हाण यांच्यासह अनेक काँग्रेसची नेतेमंडळी उपस्थित होते राहुल गांधी बोलताना पुढे म्हणाले की देशामध्ये नोटबंदी करून आणि जीएसटी लावून मोदींनी नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे, त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम नाही, त्यांना नोकऱ्या नाहीत, शेतकऱ्यांचे कर्ज अजून माफ झालेले नाही, मजूरदारांच्या मजुरीला योग्य मोल येत नाही, जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले आहेत, एकंदर पाहता देशांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, यामुळे सामान्य नागरिक आणि महिलांचे कंबरडे मोडले आहे,  त्यामुळे जनता परेशान झाली आहे. म्हणून मला जनतेला धीर देण्यासाठी भारत जोडो यात्रा काढावी लागत आहे, ही यात्रा कन्याकुमारीपासून तीन महिन्यापूर्वी सुरू झाली असून,  ती श्रीनगर जम्मू काश्मीर येथे जाऊन विसर्जित होणार आहे, या यात्रेमध्ये माझ्यासह अनेक नागरिक व काँग्रेसचे कार्यकर्ते सामील झाले असून हे सर्वजण माझ्यासोबत पायी तीन हजार आठशे किलोमीटर चालणार आहेत,  यात्रेदरम्यान मी शेतकरी, गरीब, विद्यार्थी, श्रीमंत या सर्वांशी हितगुज करत असून मला यावेळी ग्राउंड लेव्हलचा अनुभव येत आहे. असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष नागेलीकर यांनी केले, कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता

No comments:

Post a Comment