परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील श्री सुर्वेश्वर मंदिर येथे मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी भव्य शिव सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक कार्यक्रमाचा परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्री सुर्वेश्वरनगर विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री सुर्वेश्वर मंदिर येथे मंगळवारी भव्य शिव सत्संग कार्यक्रम रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत परळी वैजनाथ येथील आर्ट ऑफ लिव्हींग सत्संग मंडळाचे सदस्य यांच्या सुमधुर व ओजस्वी वाणीतून हा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री सुर्वेश्वर नगर विकास समिती परळी वैजनाथ यांनी केले आहे. .
No comments:
Post a Comment