Tuesday, November 8, 2022

बीड अक्षरधाम दीपावली अंकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बीड येथून प्रकाशित होणारे व अल्पावधीत संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणारे वृत्तपत्र बीड अक्षरधाम चे आज सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी जव्हार शिक्षण संस्था संचलित वैजनाथ महाविद्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले.
आज सोमवारी सकाळी 11 वाजता वैजनाथ महाविद्यालय येथे प्राचार्य डी.व्ही मेश्राम यांच्या हस्ते दैनिक बीड अक्षरधाम चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य मेश्राम सर म्हणाले की, सध्या ऑनलाईन डिजिटल युगात वर्तमानपत्र चालवणे अतिशय अवघड बाब असली तरीही वाचक वर्ग वर्तमानपत्रे वाचल्याशिवाय राहत नाहीत कितीही डिजिटल युग झाले तरीही पेपर हातात घेऊन वाचण्याची आवड आजही अनेक वाचकांना असल्याचे सांगून दैनिक बीड अक्षरधाम चे संपादक प्रा. बालाजी जगतकर यांनी दीपावली विशेषांक अत्यंत वाचनीय व आकर्षक काढला असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी वैजनाथ महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. डी व्ही मेश्राम . प्रा.डॉ. पी. एल. कराड, प्रा. हरिष मुंडे , डॉ रमेश राठोड, डॉ. बी व्ही केंद्रे, डॉ व्हि जे चव्हान,,डॉ टी ए गित्ते, प्रा यू आर कांदे,डॉ विश्वनाथ फड प्रा. बाबासाहेब शेप यांच्यासह. तसेच पत्रकार अनिरुद्ध जोशी, मोहन व्हावळे, प्रा. प्रवीण फुटके, संतोष जुजगर, संपादक बीड अक्षरधाम बालाजी जगतकर, प्रा.दशरथ रोडे , कैलास डुमणे, श्रीराम लांडगे, बालासाहेब फड, अभिमान मस्के, पद्माकर मुजमुले, निवृत्तीआप्पा, बालाजी ढगे, रावसाहेब जगतकर  व इतर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment