हैदराबाद :- प्रेयसीने धोका दिल्याचा आरोप करत मंगळवारी एका तरुणाने फेसबुक लाइव्ह करून स्टोन कटर मशीनने स्वतःचा गळा चिरला. ही घटना हैदराबादची असून, तरुण उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील रहिवासी आहे. माहिती मिळताच कुटुंबीय हैदराबादला रवाना झाले. प्राथमिक माहितीनुसार, शैलेशचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तो काही दिवसांपूर्वी हैदराबादला कामासाठी गेला. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्याशी ठरवले. तरुणाला याची माहिती मिळताच त्याने प्रेयसीशी संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. संपर्क न झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. लाइव्ह येत त्याने,
"सगळ्या मित्रांना विनंती आहे... माझं लग्न झालं नाही... त्याप्रमाणे तिचंही लग्न होऊ देऊ नका... प्रेम केलं होतं, खेळ नव्हता... आता कुणाशीही पुन्हा भेट होणार नाही..." असे म्हटले आणि नंतर बाजूला ठेवलेल्या मशीनने गळा चिरला. गावातील काहींनी शैलेशला लाइव्ह पाहिल्यानंतर कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी हैदराबादमधील त्यांच्या ओळखीच्या लोकांना फोन केला, त्यांनी शैलेशला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे.शैलेश वाचला तरी त्याला बोलता येण्याची शक्यता कमी आहे, असे डॉक्टर सांगत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे पुरंदरपूर पोलिसांनी सांगितले.


No comments:
Post a Comment