परळी वैजनाथ (प्रतिनिधी) देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाची नगरी म्हणजेच परळी वैजनाथ मध्ये सध्या चोऱ्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून आठ नोव्हेंबर रोजी तर चक्क शहरातील एका पत्रकाराची गाडी रेल्वे स्टेशन येथून चोरीस गेली आहे.
सविस्तर माहिती अशी की, परळी शहर पोलीस स्टेशन आणि संभाजीनगर पोलीस स्टेशन यांच्या हद्दीमध्ये सध्या घरफोडी आणि चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यामुळे शहरातील नागरिक रोज रात्री तणावाच्या वातावरणात झोपत आहेत. काही दिवसापूर्वी शहरातील कावेरी लॉज परिसरातील हनुमान मंदिर येथे चोरी झालेली असताना त्यानंतर लगेचच वैद्यनाथ बँक कॉलनी आणि माधवबाग परिसरातही एक घरफोडी झाली असून परळी शहरातील पोलीस नेमके करतात तरी काय ? असा आरोप परळीतील नागरिक करत असून आता आमच्या घराची सुरक्षा रामभरोसे आहे की काय असे म्हणत आम्ही रोज रात्री राम भरोसे झोपत आहोत असे म्हणत त्यांनी परळी पोलिसांवरती झोपेचे सोंग घेत असल्याचा एक प्रकारे आरोपच केला आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत अंबाजोगाई विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जातीने लक्ष द्यावे अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

No comments:
Post a Comment