Tuesday, November 1, 2022

प्रा.डॉ. सखाराम वाघमारे व प्रा.डॉ. संतोष खिराडे संपादित 'संत रविदास : जीवन आणि कार्य' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.

जयसिंगपूर (कोल्हापूर) येथे महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक/प्राध्यापक परिषद महाराष्ट्र यांनी दि.३० आक्टोबर २०२२ रोजी   राज्यव्यापी शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन  केले होते. ही राज्य व्यापी शिक्षण परिषद सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर सभागृह जयसिंगपूर (कोल्हापूर) येथे संपन्न झाली. या परिषदेत डॉ. वाघमारे व डॉ. खिराडे संपादित ' *संत रविदास : जीवन आणि कार्य*' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. 
हा प्रकाशन सोहळा स्वराज संघटनेचे अध्यक्ष तथा मा. खासदार छत्रपती संभाजी राजे, इंदौरच्या अहिल्याबाई होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहजी राजे होळकर, लोकसभा सदस्य मा. खा. धैर्यशील माने, शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. डॉ. राजेंद्र पाटील, माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व मा. खा. राजू शेट्टी, श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन मा. गणपत दादा पाटील, मा. आमदार उल्हास पाटील, महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा.डॉ. सखाराम वाघमारे, मुरलीधर गोडबोले, प्रदेश महासचिव राम येडते, प्रा. डॉ. दत्ताजी नरसाळे पाटील, सहशिक्षक धर्माजी उदबाळे, प्रा.डाॅ. दयानंद उजळंबे, प्रा.डॉ. हरी वाघमारे आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. प्रा.डाॅ. सखाराम वाघमारे यांची आतापर्यंत विविध विषयांवर एकुण आठ तर डॉ. संतोष खिराडे यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. दोघांचेही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरून अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रातून विविध विषयांवर लेखन केले असून अनेक व्याख्याने दिली आहेत.
 सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या या दोघांनाही महाराष्ट्र शासनाचे व विविध सेवाभावी संस्थांनी विविध पुरस्कार देऊन गोरविले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब (काका) देशमुख, सचिव  मा. गोविंदराव देशमुख, अंधोरीचे मा. सरपंच सत्यभूषण क्षिरसागर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण दळवे, प्रा.डाॅ. जगन्नाथ तुडमे, प्रा. डॉ. अमोल गंगणे, प्रा.डाॅ. संजय खाडप, प्रा. डॉ. बायजा कोटुळे, प्रा. डॉ. मनिषा देशमुख, प्रा. डॉ. अल्का देशमुख, प्रा. डॉ. गजानन सवणे, प्रा. गोविंद झाडके, प्रा. साहेबराव दिक्षित, प्रा. नरसिंग उदार, प्रा.मकरंद जोगदंड, प्रा. विलास किर्दंत व सर्व सहकारी  प्राध्यापक, कर्मचारी,मित्र, नातेवाईक यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment