Friday, November 18, 2022

भारतीय स्वातंत्र्यसंग्राम. मराठवाडा मुक्तीसंग्राम. आणि गोवा मुक्तीसंग्रामात सहभाग स्वातंत्र्यसैनिकांना मिळणार 20 हजार रुपये पेन्शन.


मुंबई :- राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जिवाची बाजी करून भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि गोवा मुक्तीसंग्रामात सहभाग नोंदवून स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. त्या स्वातंत्र्यसैनिकांना आता 20 हजार रूपये पेन्शन देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 6 हजार 229 स्वातंत्र्यसैनिकांचा याचा लाभ होणार आहे.

राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तिवेतन दुप्पटीने वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे आता स्वातंत्र्यसैनिकांना 10 हजार रुपयांऐवजी दरमहा 20 हजार रुपये निवृत्तिवेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, मराठवाडा मुक्तिसंग्राम आणि गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना याचा लाभ मिळणार आहे. या निवृत्तिवेतनात वाढ करण्याची मागणी वारंवार होत होती. यासाठी वार्षिक अंदाजे 74.75 कोटी रुपये इतका अधिक खर्च येईल. या निवृत्तिवेतन वाढीचा राज्यातील 6 हजार 229 स्वातंत्र्यसैनिकांना लाभ होईल. यात भारतीय स्वातंत्र्यलढा, हैदराबाद मुक्तिसंग्राम, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश असेल.

No comments:

Post a Comment