Thursday, April 14, 2022

लोह्यात भीमसैनिकांनी दिली बाबासाहेब यांच्या कार्य स्मृतींना झळाळी.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी केल्या जाग्या.


लोहा (प्रतिनिधी) लोहा शहरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे लोहा शहर पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा बॅनर भरून गेले आहे परंतु यात एक बॅनर असे आहे की त्या बॅनर वर  विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या काही ठराविक योजना व रणनीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तिविशेष या बॅनर मधून दिसून आले हे बॅनर लोहा शहरातील भीमसैनिक छगन सिद्धार्थ हाटकर व गजानन कराडे यांच्या संकल्पनेतून लावण्यात आले या बॅनरने लोहा शहर व परिसरातील सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे
या बॅनर वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तिविशेष तसेच छगन सिद्धार्थ हाटकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी माझ्या मनामध्ये काय आहे हे सर्व एका बॅनर वर प्रिंट करून लावण्यात आले आहे
पुढील सर्व लेख हा स्वतः छगन सिद्धार्थ हाटकर यांनी लिहिला आहे
* *विश्वरत्न,विश्र्वभूषण,भारतरत्न,महाविद्वान,महानायक, अर्थशास्त्री,महान इतिहासकार,संविधान निर्माता,क्रांतीसुर्य,युगपुरुष,परमपूज्य बोधिसत्व,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर...

*""मी प्रथमत: आणि अंतीमतः भारतीय" हे ब्रीद आमच्या मनात रुजवणाऱ्या "खऱ्या भारतीयाची" जन्म उत्सव येत आहे
उत्सव समतेचा 
उत्सव तुमच्या आमच्या जगण्याचा...

*आमच्या कित्येक पिढ्या अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रज्ञासूर्याची जन्म उत्सव येत आहे..

*गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणाऱ्या महामानवाचा जन्म उत्सव येत आहे...

*मूकनायक, समता, जनता, प्रबुद्ध भारत या सारख्या वर्तमान पत्रातून शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महान संपादकांचा जन्म उत्सव येत आहे...

*ज्या महामानवाचे नाव घेताच संघर्ष करण्याची उर्जा निर्माण होते अश्या महामानवाचा जन्म उत्सव येत आहे...

*जगातली सर्वात मोठी "लोकशाही" निर्माण करणाऱ्या "लोक नायकाची" जयंती येत आहे..!

* गरीब असो वा श्रीमंत सर्वांना एकाच मताचा अधिकार देणाऱ्या "महान समतावाद्याची" जयंती येत आहे..

* माझा पहिला जन्म आईच्या उदरातून झाला पण माणूस म्हणून जगण्याचा माझा दुसरा जन्म भारतीय संविधानाच्या माध्यमातून झाला हे मी कदापि ही विसरणार नाही..!
होय...!
"माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार देणाऱ्या बापजींचा जन्म उत्सव येत आहे.."

* भारतातील शोषित, पिडीत, स्पृश्य-अस्पृश्य महिला यांची "ब्राह्मणवादी दास्यतेतुन मुक्तता" करणाऱ्या "स्त्रीदास्य मुक्तीदात्याचा" जन्म उत्सव येत आहे..

* समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या "बुद्धाच्या" चार मूल्याला संविधानात घेऊन नव्या भारताची निर्मिती करणाऱ्या "आधुनिक बुद्धाचा" जन्म उत्सव येत आहे...


*"जगातील एकमेव विद्यार्थी" ज्याने "लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स" येथील 8 वर्षांचा अभ्यासक्रम फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यात पूर्ण केला अशा "जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्याची" जयंती येत आहे..

*ज्या समूहाला इथल्या व्यवस्थेने निसर्गनिर्मित पाणी नाकारलं त्याच समूहातल्या माणसाने नदीजोड प्रकल्पाचं महत्व सांगून देशाला सुजलाम सुफलाम केलं..
होय, 
तुमच्या आमच्या आयुष्यात "हिरवळ" पेरणार्या त्याच "संजीवकाची" जयंती येत आहे..

*जगातील सर्वात मोठी "वैयक्तिक लायब्ररी" ज्यात पन्नास हजारांपेक्षा अधिक विविध विषयांवरील पुस्तके होती.. अशा वाचनवेड्या व आजन्म विद्यार्थी असणाऱ्या "पुस्तक प्रेमीचा" जन्म उत्सव येत आहे..

*गणतीच माझी गुलामात होती,
जिंदगीच माझी सलमात होती.
तोडलीस माझी गुलामीची बेडी,
अशी झुंजणारी तुझी जात होती...

*मी तुझा आणि तुझ्या शतकाचा एल्गार म्हणतो ज्यांना बेईमान होयचे असेल त्यांना खुशाल होऊ दे मी माझ्यापुरते कापरासारखे छान जळून तुझे नाव दिगंतात गाजवेल... 
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर 
#मूकनायक...

*लाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा
विचारांचा वादळ निर्माण करा
बदल नक्की घडेल..!

*अख्ख्या जन्मात असं कोणतं देणं नाही.. ज्या देण्याने बाबांचे उपकार फेडल्या जातील..बा-भीमा!म्हणजे आमच्या फटक्या आयुष्यातील पहिलं

No comments:

Post a Comment