Thursday, April 14, 2022

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती हिमायतनगरात मोठ्या उत्साहात साजरी.

 हिमायतनगर (प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती दि 14 एप्रिल रोजी हिमायतनगर शहरातील बौध्द विहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

    त्यानंतर  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आला उपस्थित सर्व बौद्ध उपासक-उपासिकानी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व नंतर शहरातील मुख्य रस्त्याने भव्य अशी मिरवणूक काढली यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी महावीर सेठ श्रीश्रीमाळ यांनी मिरवणुकीत सहभागी असलेल्या सर्व बांधवांना मोतीचुरचे लाडू व थंड पाणी देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन केले यावेळी माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, उप तालुका प्रमुख विलास वानखेडे,राहुल लोणे, सोंनकांबळे सर ,गजानन चायल,लक्ष्मण डांगे,काँग्रेस शहर अध्यक्ष संजय माने,माधव पाळजकर, शाम ठाकरे,मोहन ठाकरे,सदाशिव काळे, प्रतीक दारवंडे, बाळा कदम, सह गावातील जेष्ठ नागरिक,पत्रकार, विविध पदाधिकारी, बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.ह्या मिरवणुकीत हिमायतनगर येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे साहेब यांनी चौक पोलीस बंदोबस्त लावल्याने ही मिरवणूक शांततेत पार पडली

No comments:

Post a Comment