Thursday, February 17, 2022

क्रांतीवीर लहुजी साळवे यांचे भारतीय स्वतंत्र्यासाठीचे योगदान अविस्मरणीय. ;- के डी उपाडे,अशोक शेप. यांचे संयुक्त प्रतिपादन .

 * तोरा इंग्रजाचा पाहुनी लहुजी कडाडला. म्हणून तिरंगा फडकला. 

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्यासाठी  बहुजन समाजातील तरुणांना सशस्त्र  क्रांती चे धडे देऊन राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करणारे, महात्मा फुले यांचे गुरु  सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिक्षणासाठी मुलांना प्रवर्त करणारे इंग्रजाचा तोरा पाहुणे लहुजी कडाडला  म्हणून तिरंगा फडकला अशा महान क्रांती वीर लहुजी साळवे यांचे भारतीय स्वातंत्र्यासाठी चे योगदान अविस्मरणीय आहे असे संयुक्त प्रतिपादन  राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक संघाचे परळी शहराध्यक्ष  व कार्याध्यक्ष अशोक सेप यांनी केले. क्रांतिवीर लहुजी साळवे चौक येथे  नामवंत प्रसिद्ध वकील जीवन राव देशमुख यांच्या शुभ हस्ते लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी  आयोजक के डी उपाडे, अशोक सेफ अरुण जोशी, महादेव पारदे, प्रभाकर गायकांबळे, विश्वनाथ पारदे, इत्यादींनी पुष्पहार अर्पण करून  अभिवादन केले.             साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात वैद्यनाथ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक संपतराव वाघमोडे यांच्या शुभहस्ते क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अशोक शेप ,  पत्रकार अभिमान मस्के, संजय कराड, अरुण जोशी, विकास मुंडे ( ग्रामपंचायत सदस्य कनेरवाडी ), शिवाजी केदार, संजय मुंडे, विश्वनाथ पारदे, बाबुराव साळवे, बालासाहेब गिरम, लिलाचंद ताकतोडे, जितेंद्र मस्के, महेश रोडे, पि पि गाय कांबळे, अशोक गायकवाड, रविराज पाटोळे, प्रभात रंगाचे, रंगनाथ मुंडे, इत्यादी विविध सामाजिक घटकातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून  अभिवादन केले शेवटी आयोजक के डी उपाडे यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment