Thursday, February 24, 2022

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य कसा असेल तुमचा दिवस.

 

आज दिनांक 24 फेब्रुवारी 2022. वार गुरूवार. आज माघ वद्य अष्टमी. आज चंद्र वृश्चिक राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज राशीच्या अष्टम स्थानातील चंद्र भ्रमण प्रतिकूल असून काही ताण असेल तर शांत राहा. भाग्यस्थानातील मंगळ शुक्र धार्मिक आस्था निर्माण करतील. दशमस्थ ग्रह अनेक संधी मिळवून देतील. दिवस शुभ.


वृषभ

राशीच्या सप्तम स्थानातील चंद्र आज काहीसा जोडीदाराची काळजी निर्माण करेल. प्रकृती नरम राहिल. अष्टम स्थानातील मंगळ फारसा अनुकूल नाही. पण शुक्रसोबत प्रवास योग आणेल. दिवस बरा आहे.

मिथुन

आज षष्ठ स्थानातील चंद्र नातेवाईकांकडून लाभ मिळवून देतील. शनि बुध मात्र प्रकृतीची काळजी घ्या असे सुचवत आहे. दिवस शुभ.

कर्क

चंद्र आज शिक्षण क्षेत्रात विशेष घडामोडी घडवून आणेल. तुमच्यावर नवीन जबाबदारी येईल आणि ती तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडाल. दिवस शुभ.

सिंह

आज दिवस अनेक भाग्याचे दरवाजे उघडणार आहे. गृह चिंता वाटेल. पण गुरुकृपेने मार्ग मोकळा होईल. आर्थिक लाभ होतील. दिवस शुभ आहे.

कन्या

आज दिवस कष्ट देणारा असून प्रकृती जरा जपून असावे. काही विचित्र अशी हुरहूर लागून राहिल. प्रवास योग येतील. काळजी घ्या. दिवस साधारण आहे.

तूळ

राशीच्या धनस्थानात चंद्र वैवाहिक जीवनात सुखाचे क्षण निर्माण करेल. एकत्र खरेदी कराल. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. घरात काही विशेष घटना घडतील. दिवस शुभ.

वृश्चिक

चंद्रभ्रमण काही प्रकृतीच्या तक्रारी, आर्थिक घडामोडी, तसेच मोठ्या घराण्यातील लोकांची भेट घडवून आणेल. शांत राहून घरात दिवस व्यतीत करा.

धनु

चंद्रभ्रमणआज काही घटना घडवून आणेल. संततीला वेळ द्यावा लागेल. राशीतील मंगळ स्वभावात थोडे उग्र स्वरूप आणेल. दिवस बरा आहे.

मकर

राशीच्या लाभ स्थानातील चंद्र भ्रमण घरामध्ये काही जबाबदारी आणेल. त्यात तुम्ही गुंतून जाल. मंगळ शुक्र खर्चाचे नवीन मार्ग तयार करतील. दिवस चांगला आहे.

कुंभ

चंद्र दशम स्थानात आहे. प्रवास महत्त्वाचे फोन तसेच बंधुभेट घडवून आणेल. व्यय शनि सूर्य कायदा पाळा असे सांगत आहे. सांभाळून असा. दिवस बरा.

मीन

आर्थिक आणि कौटुंबिक भान देणारा हा दिवस आहे. कुठूनतरी अचानक लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस अतिशय चांगला आहे.

शुभम भवतु.

No comments:

Post a Comment