बीड (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त महिला मराठा क्रांती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या कर्तृत्ववान महिलांना जिजाऊ रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. बीड येथील स्काऊट गाईड भवन येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई श्यामसुंदर काळे पाटील यांनी केले होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. छाया सोंडगे खोसे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून रत्नमालाताई धांडे, सरस्वती जनार्दन तुपे, पीएसआय मीनाताई तुपे यांची उपस्थिती होती.
पुरस्कार सन्मानित महिला सौ . सुवर्णाताई निंबाळकर राजे, सातारा शिवमती सुंदरताई चौरे, बीड, शिवमती जयश्रीताई सावंत, शिवमती शोभाताई जाधव, प्रा .शांताताई पवार, शिवमती मंगलताई उबाळे, शिवमती आशाताई चव्हाण, शिवमती अरुणाताई आवटे, शिवमती विद्या तीबोले, शिवमती कमल निंबाळकर, जिजाऊरत्न पुरस्कार सन्मान मिळालेल्या सर्व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रेखा ताई ढेरे घोलप, व राजश्री काळे पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित बहुसंख्येने महिला होत्या जिजाऊ रत्न पुरस्कार समिती प्रा. संध्या पाटील प्रा. संगीता इंगोले, अनिताताई शिंदे कार्यक्रमाला उपस्थित होत्या. अनिता भोसले, मीरा डावकर, शिवसेनेच्या चंद्रकला बांगर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ताई माने, सुजाता माने, सुजाता सौ एडवोकेट प्रेरणा डोईफोडे , आशाताई जगताप सौ मीनाताई चौरे सौ , सावित्री शिंदे सपकाळ, सुषमा गायकवाड, स्वप्नाली उबाळे, सौ शितल गायकवाड, सौ . उशा गोरे, सौ. सुजाता चव्हाण, सौ. दुर्गा जाधव उपस्थित होत्या.
संभाजी ब्रिगेडचे शरद चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे संतोष जाधव, देवीसिंग शिंदे, व्याख्याते ज्ञानदेव काशिद, विनोद आप्पा इंगोले, बाळकृष्ण झोडगे, शहादेव हिंदोळे, दादासाहेब सादोळकर, वैभव स्वामी, डोंगरे सर, परजणे सर ,तसेच बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छोट्या ऋषिकेश हावळे या बालकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पोवाडा गायीला. दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी अध्यक्ष कार्यक्रमाचे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नमाला ताई धांडे यांनी केले ,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ समिती यांनी नियोजन आयोजन करून पुढाकार घेतला. आभार प्रदर्शन शेवटी प्रा . वैशाली ताई तळसकर यांनी केले. कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला.
प्रमुख पाहुणे प्रा. छायाताई सोडगे म्हणाल्या की, महिलांना प्रेरित करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा असून जास्तीत जास्त महिलांनी मुख्य प्रवाहात येवून कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कुंदाताई काळे म्हणाल्या की, आज आम्ही कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत आहोत. जिजाऊंचा विचार पुढे नेण्यासाठी आपण एकत्रित येवून कार्य करणे काळाची गरज आहे. आज पुरस्कार देताना खूप आनंद होत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पी एस आय मीना तुपे मॅडम म्हणाल्या की, महिलांनी संकटाना संधी समजून त्यातून मार्ग काढला पाहिजे. जिजाऊंचा आदर्श समोर ठेवला तर कोणतेही संकट मोठे वाटणार नाही. यावेळी कमल निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. शांता पवार, चौरे मॅडम, सावंतआई यांनी आपले मनोगत पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यक्त केले. रत्नमालाताई धांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
No comments:
Post a Comment