बीड ;- टायगर ग्रुप च्या वतीने जिल्हाध्यक्ष अविनाश भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात एमआयडीसी भागामध्ये मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी करण्यात आली

शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील एमआयडीसी भागामध्ये टायगर ग्रुपचे बीड जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये व प्रत्यक्ष उपस्थिती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व टायगर ग्रुप च्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी बीड शहरातून भव्य दिव्य बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी टायगर ग्रुप चे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पवन प्रशांत वाघमारे किरण भिसे अकबर शेख विजय रोकडे दीपक घोरपडे लखन सांबड अंबर साखरे अशोक काळवणे केशव रत्नपारखे क्रिश पांचाळ आनंद ससाने आदी टायगर ग्रुप बीड जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते