Wednesday, February 23, 2022

केज अंबाजोगाई रोडवर मोटार सायकल व टेम्पोचा अपघात. मोटार सायकलस्वार जागीच ठार.


केज (प्रतिनिधी) :- केजअंबाजोगाई रोडवर उपजिल्हा रुग्णालय केज पासून सुमारे २०० मीटर अंतरावर मोटार सायकल व टेम्पोचा अपघात होऊन त्यात मोटारसायकलस्वार जागीच गतप्राण झाला.

या बाबतची माहिती अशी की दि. २२ फेब्रुवारी मंगळवार रोजी रात्री ९:३० वा. केज-अंबाजोगाई रोडवर उपजिल्हा रुग्णालय केज पासून सुमारे २०० मिटर अंतरावर तांबवेश्वर फर्निचर या दुकाना समोर अंबाजोगाई कडून बीडच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो क्र. (एम एच२३/ए यु-२२९०) आणि केज कडून अंबाजोगाईच्या दिशेने जाणाऱ्या मोटार सायकल क्र. (एम एच-४४/आर-१७७४) या दोन वाहनांचा भीषण अपघात झाला.  अपघातात मोटार सायकस्वार संतराम वय (४५ वर्ष) कावळे, रा. परळी याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती  मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरून पोलीस नाईक उमेश आघाव, मंगेश भोले, अशोक गवळी, हनुमंत गायकवाड हे अपघाताच्या घटनास्थळी हजर झाले. त्या नंतर प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले आहे.

No comments:

Post a Comment