पंढरपूर : (प्रतिनिधी) नुकतेच जन्मलेले बाळ मरण्यासाठी रस्त्यावर फेकून निर्दयी माता निघून गेली पण 'देव तरी त्याला कोण मारी' चा प्रत्यय आला आणि हे बाळ रुग्णालयात पोहोचले !
नवजात बालकाला कुठेतरी निर्जन रस्त्यावर फेकून देण्याच्या अनेक घटना घडत असतात. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या निष्पाप बाळावर हमखास अशी दुर्दैवी वेळ येत असते. अशीच एक घटना पंढरपूर तालुक्यात नारायण चिंचोली येथे घडली पण या नवजात बाळाच्या मदतीला देव धावून आल्याप्रमाणे घटना घडली. पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर असलेल्या नारायण चिंचोली या गावाजवळ साईराज ढाब्याच्या समोरच्या बाजूला अंधाराचा फायदा घेऊन एक मातेने हे पाप केले होते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला रस्त्याच्या मध्यभागी ठेवून मातृत्वाला कलंक असलेली कुणी माता निघून गेली होती.

अंधाराचा रस्ता आणि रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेल्या या बाळाला एखादे वाहन सहज चिरडून गेले असते पण ज्याला देव तारतो त्याला मारणार तरी कोण ? फुलचिंचोली येथील अविनाश नागनाथ वसेकर हे रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान चार चाकी गाडीने मायाक्का चिंचणी येथे दर्शनासाठी निघाले होते. अचानक त्यांना रस्त्यावर काही दिसले.
No comments:
Post a Comment