Wednesday, February 23, 2022

बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा च्या बैठकीत मोठा निर्णय ; दहा हजार मराठे मुंबईत जाणार.




बीड - (प्रतिनिधी) मुंबई मध्ये २६ फेब्रुवारी रोजी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात होत असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वयक यांची बैठक संपन्न झाली.
 या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून २६ तारखेच्या आंदोलनासाठी बीड जिल्ह्यातून दहा हजार लोक मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. या बैठकीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्ह्याचे समन्वयक तसेच मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून खासदार संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्यात येणार असल्याचीही माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी चे आंदोलन राज्यभर पेटण्याचे संकेत मिळत आहेत.

No comments:

Post a Comment