Thursday, February 24, 2022

शेतकऱ्याचा मुलगा झाला सी. ए. शिवजयंतीदिनीच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात केला माता-पित्यासह मुलाचा सत्कार.

 

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) सामान्य शेतकर्याच्या मुलाने जिद्द व चिकाटीने अभ्यास करत सी ए परिक्षेत यश संपादन करत पदवी मिळविली.याबद्दल त्याचा शिवजयंती निमीत्त वत्सल मंगल कार्यालयात पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात माता- पित्यासह सत्कार करण्यात आला.
 उखळी बु. जवळील पारधवाडी येथील श्रीपती भानुदास फड याने अत्यंत गरीबीतुन शिक्षण घेत सीए पदवी पुर्ण केली.गुरु-शिष्य स्मरण यात्रेच्या समारोपप्रसंगी दि.19 फेब्रुवारी रोजी वत्सल मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या सामुदायिक विवाहसोळ्याप्रसंगी बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथ सोळंके, रा.काॅ.बीड जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, माजी उपनगराध्यक्ष रविद्र परदेशी, माजी नगरसेवक जालिंदर नाईकवाडे, नाथ प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष शंकर कापसे,अ.भा.वारकरी मंडळ मराठवाडा विभागीय अध्यक्ष  ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, महेंद्र रोडे यांनी हजारोंच्या साक्षीने फड यांचा माता पित्यासह गौरव करत पाठीवर कौतुकाची थाप ठेवली तसेच उपस्थितांनी फड यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment