Monday, February 21, 2022

आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या लहान मुलींना ॲड माधव जाधव यांनी दिला मदतीचा आधार.

अंबाजोगाई : (प्रतिनिधी)  परळी मतदार संघातील अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बु. या गावातील विष्णुदास फोलाने यांचा काही वर्षांपूर्वी आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी शिवकन्या विष्णुदास फोलाने यांचे नुकतेच 25 जानेवारी 2022 रोजी आजाराने निधन झाले. त्यांना *दोन लहान मुली अंजली व सई असून अंजली इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत आहे. व सई इयत्ता चौथीमध्ये आहे* . या दोन्ही लहान मुलींचे आई-वडील यांना काळाने हिरावून घेतले व या दोन्ही मुलींचे आई वडिलांचे छत्र हरवले. घरामध्ये एक वृद्ध आजी याशिवाय दुसरे कोणीही नाही. तसेच कुटुंबाला कोणताही आर्थिक आधार नाही . ही बाब *किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष तथा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड माधव जाधव यांना गावकऱ्यांनी सांगितली असता ॲड माधव जाधव यांनी धानोरा बु. या गावी जाऊन त्या कुटुंबियांची भेट घेऊन लहान मुली अंजली व सई या दोघींना 20000/-( वीस हजार रुपयाचा) धनादेश ॲड माधव जाधव यांनी देऊन दोन्ही अनाथ मुलींना मदतीचा आधार दिला* . यावेळी ॲड माधव जाधव यांच्यासोबत संभाजीराव वाळवटे, भगवानराव फोलाने,ऋषिकेश फोलाने , इरफान शेख ,सतिश आदनाक, प्रमोद डोंगरे , कृष्णा सोमवंशी,पप्पू भैया आदनाक इत्यादी उपस्थित होते...

No comments:

Post a Comment