अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना मिळणार उर्वरित 25 टक्के अतिवृष्टी अनूदान.
बीड — महाराष्ट्रातील बहुतांश भागात जून ते सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानभरपाई पोटी राज्य शासनाने वाढीव दराने उर्वरित मदत वितरित करण्याचा शासन आदेश महसूल व वन विभागाच्या वतीने जारी केला असून, याव्दारे राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 1035 कोटी 14 लाख रुपये वितरित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यापैकी मराठवाड्यात सर्वाधिक मदत बीड जिल्ह्यात मिळाली असून बीड जिल्ह्यासाठी 142 कोटी 31 लाख रुपये मदतीपोटी विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यास सर्वाधिक 142 कोटी 31 लाख रुपये मदत प्राप्त झाली असून जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत.
राज्य शासनाकडून जाहीर झालेल्या विशेष आर्थिक पॅकेज मधून बीड जिल्ह्यात नुकसानीच्या 75% प्रमाणे 502 कोटी रुपये मदत मिळाली होती. तर आता उर्वरित 25% वाढीव दराने 142 कोटी रुपये मंजूर करून वितरित करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment