Wednesday, February 16, 2022

आहो आश्चर्य ! आधुनिक युगातील परळीत मोबाईल न वापरणारा व्यापारी सापडला. त्यांचे नाव शाम शंकरअप्पा बुद्रे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)वर्तमान जनजीवन व्यवस्थेत मोबाईलचं ठोकडं हातात नाही असा एकही माणुस शोधुन सापडणार नाही. अलीकडे तर या ठोकड्याशिवाय लोकं जगु शकत नाहीत अशी परिस्थिती आली. जास्तीच्या वापरामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असले तरी क्षणभरही त्याच्याशिवाय न राहणारा सध्याचा जमाना पण अशाही परिस्थितीत आमच्या प्रतिनिधीला एक मोठा व्यापारी परळी शहरात सापडला. ज्याचं नाव शाम शंकरआप्पा बुद्रे वय ५०, सत्तर वर्षापासुन असलेला वडिलांचा हॉटेलचा पारंपारीक व्यवसाय त्यांचा आहे. मोबाईल शोध लागल्यापासुन अद्यापपर्यंत त्यांनी कधीच मोबाईल वापरलेला नसल्याची जोरदार चर्चा पण तरीही जनसंपर्क मात्र दांडगा असुन सर्वांच्या सोबत स्नेह ठेवुन संवाद केल्याशिवाय रहात नाहीत हे तितकेच खरे जगाला मोबाईलनं वेड लावलं.सारे व्यवहार याच ठोकड्यावर होतात. अगदी जनावरे राखणारया माणसापासुन भाजी मंडीतसुद्धा मोबाईलशिवाय कुणी राहिना. बाळ लक्षवेध- रांगावला लागलं इथपासुन वयोमाने बोलता येईना तरीही हातातला मोबाईल सुटता सुटेना अशी परिस्थिती आहे. एक वेळ जेवण विसरतील पण हातात मोबाईल बुगोकुणीही विसरत नाही, ऑनलाईनचा जमाना आला त्यातही कोरोनासारख्या संकटामुळे शिवाय डिजिटल व्यवहारामुळे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक मोबाईल बनला. एखाद्याच्या हातात मोबाईल नाही असा माणुस शोधुन पाहिला तरी मिळणार नाही. पण आमच्या प्रतिनिधीला मात्र परळी शहरात एक हॉटेल व्यावसायिक मोबाईलविना सापडले. म्हणुन हा लिहिण्याचा खटाटोप. सरदार सायकल स्टोअर्स समोर, रेल्वे स्टेशन रोडवर शाम बुद्रे यांचे हॉटेल पारंपारीक आहे. पुरी-भाजी कुठे खावी?तर बुद्रेच्या हॉटेलला चला अशी चर्चा लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे या हॉटेलात बसुन आवडीने पुरीभाजी खायचे. तसं पाहता बुद्रे हे सुशिक्षित आहेत. त्यांची लेकरं अमेरिकेत शिक्षणासाठी पण आहेत.  असं असताना मोबाईलविना ते राहतात हे नवल. त्यांच्याजवळ एक ठोकडं दिसतच नाही. त्याचा शोध लागल्यापासुन आजतागायत त्यांनी मोबाईल खरेदी केलेला नाही हे विशेष. कुटुंबियात लेकरंबाळं नविन पिढी कदाचित वापरतात. पण शाम बुद्रे मात्र हात लावत नाहीत. या संदर्भात त्यांना काही प्रश्न केले. तेव्हा ते म्हणाले माझ्या दृष्टीने मोबाईल वापरणं म्हणजे रिकामी डोकेदुखी. प्रत्यक्ष माणसाचा संवाद होत नाही. त्यासाठी मोबाईल वापरत नाही. संपुर्ण परळी शहरात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांचा दांडगा संपर्क असुन  जीवाभावाचे त्यांचे मित्र आहेत. त्यांच्या हॉटेलवर सतत गर्दी असते.    व्यवहाराला प्राधान्य आणि मोबाईलपासुन दुर राहणे हे सुत्र त्यांनी पाळलेलं आहे. त्यांचा स्वभाव शांत, मनमिळावु आणि माणसं जोडण्याचा आहे. अनेकदा रस्त्याने दुचाकीचा वापरही न करता पायपीट करत जातात. आगामी काळातसुद्धा आपण कधीच मोबाईल वापरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बाकी काही असलं तरी आजच्या जमान्यात मोबाईलविना कुणी सापडणार नाही पण बुद्रेसारखे माणसं परळीत सापडले हे काही कमी नाही. त्यांच्या या भुमिकेचे भाजपाचे शहर उपाध्यक्ष महादेव इटके, युवक नेते अश्विन मोगरकर, विकास हालगे, गणपत हरंगुळे, सुशील हरंगुळे, सचिन स्वामी, दत्तात्रय गोपनपाळे यांच्यासह अनेकांनी मात्र विशेष कौतक केलं.

No comments:

Post a Comment