Monday, April 5, 2021

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य. ५ एप्रिल २०२१ : काय आहे सोमवारचे भविष्य !


  • आजचे राशी भविष्य ५ एप्रिल २०२१ : काय आह सोमवारचे भविष्य?
  • जाणून घ्या कसा जाईल आपला आजचा दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

 राशी भविष्य ५ एप्रिल २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: अडचणीतून भाग्य उजळेल. वास्तवाचे भान बाळगा, गोंधळ होत असल्यास मन शांत ठेवून ज्येष्ठांचा सल्ला घ्या आणि विचार करुन निर्णय घ्या. दिवस छान जाईल. शुभ रंग - नारिंगी
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला, कायद्याचे पालन करा. तब्येत सांभाळा. भावनांवर नियंत्रण ठेवा. शुभ रंग - निळा.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: वरिष्ठांशी संबंध सुधारतील. अडचणीतून मार्ग निघेल. जुने प्रश्न सुटतील. तोडगा निघेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे. शुभ रंग - मोरपिशी.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: वेळेचा सदुपयोग करा. विचारपूर्वक निर्णय घ्या. डोकं शांत ठेवून व्यावहारिक विचार करा. घरातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. स्वतःला जपा. शुभ रंग - चंदेरी
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आर्थिक स्थिती चांगली राहील. महत्त्वाचे प्रश्न सुटतील. दिवस चांगला जाईल. शक्य असल्यास प्रवास टाळा. शुभ रंग - किरमिजी
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: चांगल्या माणसांची साथ लाभेल. वरिष्ठांच्या सल्ल्याने काम करा. गोड बोलायला शिका फायदा होईल. शुभ रंग - पोपटी
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: नैतिक आचरण चांगले ठेवा. विचारी आणि व्यावहारिक असल्यामुळे वेळ निभावून न्याल. दिवस छान जाईल. अनावश्यक प्रवास टाळा आणि तब्येत सांभाळा. शुभ रंग - आकाशी
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य  / Scorpio Horoscope Today: आश्वासन देण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे लक्षात ठेवा. सत्यवचनी राहावे. तब्येतीची काळजी घ्या. वडीलधाऱ्यांची काळजी घ्यावी . शुभ रंग - आकाशी
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. पैसा जपून वापरा. वायफळ खर्च टाळा. तब्येतीची काळजी घ्या. दिवस चांगला जाईल. शुभ रंग -  पिवळा
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: ज्येष्ठांच्या सल्ल्याने वागणे हिताचे आहे. कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याला महत्त्व द्या. आवडीच्या लोकांशी भेटी झाल्याने दिवस मजेत जाईल शुभ रंग - सोनेरी आणि पिवळा
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: घरच्यांना वेळ द्या. अडचण जाणवल्यास मोकळेपणाने संवाद साधा. मार्ग सापडेल. वाद टाळा आणि चर्चेतून प्रश्न सोडवा. भावनिक नको व्यावहारिक व्हा. शुभ रंग - तपकिरी
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: जपून खर्च करा. तब्येतीची काळजी घ्या. घरातल्यांना वेळ द्या. दिवस चांगला जाईल. शुभ रंग - राखाडी

No comments:

Post a Comment