पहाटे ३ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रुग्णालयात २० रुग्ण उपचार घेत होते. यात आयसीयू वार्डात ६ रुग्ण, तर इतर वार्डात १४ रुग्ण होते. आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णावाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं. तर इतर रुग्णांना सुटी देण्यात आली. या घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे.
रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघाचे आमदार आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनेबद्दल माध्यमांशी बोलताना माहिती दिली. आगीत रुग्णालयाचा पहिला मजला जळला असून, यात तीन रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. मृतांच्या वारसांना पाच लाख, तर जखमींना एक लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली
No comments:
Post a Comment