Saturday, April 24, 2021

पालकमंञी साहेब डाॕ.गित्तेची पाठराखन थांबवा.ऑक्सिजन बंद केला म्हणून दोन जणांचा तडफडून मृत्यू .



बीड ( प्रतिनीधी) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गीतेंनी कारभार स्वीकारल्यानंतर जिल्हा रुग्णालयाची संपूर्ण व्यवस्थाच अक्षरशःकोलमडून गेली. त्यातच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट त्यांची सत्वपरीक्षा पाहायला आली. दरम्यानच्या काळात माध्यमांनी डॉ. गितेंच्या कारभारावर टीकाटिप्पणी केली पण पालक मंत्री धनंजय मुंडेंनी गीतेंची पाठराखण करत टीका होत असते दुर्लक्ष करायचं असतं असा कानमंत्र दिला. पाठबळ खंबीर असल्याचे लक्षात येताच गीतेच्या बेफिकीर कारभारात आणखी भर पडली. परिणामी आज कोणीतरी अज्ञात इसमाने ऑक्सीजनचा काॅक या प्रकारात दोन रुग्णांचा अक्षरश: कोंबडी तडफडून मरावी असा दुर्दैवी मृत्यू झाला. धनु भाऊ आता तरी जागे व्हा तुमच्या हट्टापायी आणखी किती जणांचे बळी घेणार आहात असा प्रश्न आता जनतेतून विचारला जाऊ लागला आहे. तुमचं गीतेवर एवढं प्रेम असेल तर त्यांना जागतिक आरोग्य संघटनेत स्थान द्या पण बीडच्या रुग्णांना उड्या मारीत दवाखान्यातून बाहेर येऊ द्या ? प्रेत कूठपर्यंत जाळायची हे जनतेला कळू द्या. तुम्हाला मानसन्मान कमवायला कठोर परिश्रम करावे लागले आहेत पण गिते च्या नादी लागून ती धुळीला मिसळवण्याचा काम होऊ लागला आहे हे धनु भाऊ लक्षात घ्या.

* गिते चौकशी समिती स्थापन करणार !


स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर झटकण्यासाठी व वेळ मारून नेण्यासाठी डॉ. गीते चौकशी समिती स्थापन करणार असल्याचं सांगत आहे. ज्या व्यक्तीने ऑक्सिजन पुरवठा बंद केला त्याला तर अटक कराच पण गीते व राठोड सारख्या ना’लायकांना घरचा रस्ता दाखवा.

* धनु भाऊ गीते साठी जनतेला पणाला लावू नका.

तुमचं नितांत प्रेम गीतेवर आहे हे नितांत सत्य आहे. त्यांच्या प्रेमासाठी जिल्ह्यातील जनतेला पणाला लावू नका. तुमचं प्रेम व गीते चा कारभार जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार आहे याची धनुभाऊ जाण ठेवा.वणवा पेटला आहे गीतेच्या स्वार्थाची पोळी भाजत आहे. त्याच्या स्वार्थासााठी जनता मात्र होरपळून निघत आहे.

रेमिडीसिवीर चा घोटाळा असो की नुकतीच झालेली कंत्राटी पदभरती असो. ढेपाळलेली आरोग्य सुविधा असो हे सर्व फलित डॉ गीतेच्या कर्तृत्वाच आहे. त्यांच्या कर्तुत्वाला जोड अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांची मिळाली आहे. या जोडीच्या जीवावर बीड जिल्ह्याच्या आरोग्याचा गाडा वासराच्या नाकात वार शिरल्यासारखा चौखूर उधळतो आहे. यात जिल्ह्यातील नागरिकांचा जीव अगदी सहज किड्या मुंग्या सारखा जात आहे. धनु भाऊ तुम्ही अमरसिंह पंडित यांच्या बंगल्यावर डॉक्टर गीते ना कानमंत्र दिला टीका होत असते लक्ष द्यायचं नसतं हा कानमंत्र लोकांच्या आता जीवावर उठू लागला आहे. तुम्ही गितेंना पाठबळ द्या त्यांच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करा पूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांना नेऊन बसवा आमचं म्हणून काहीच नाही. तो तुमचा विषय आहे. पण डॉक्टर गीते जिल्हा रुग्णालया साठी बुजगावणं ठरत आहे. निष्पाप लोकांचे त्याच्या कारभारामुळे बळी जात आहेत. येणाऱ्या काळामध्ये याचे उत्तर धनु भाऊ तुम्हाला द्यायचे आहे राज्याचे राजकारण असो की जिल्ह्याचे जनता सर्व उघड्या डोळ्याने पाहत आहे हे विसरू नका. अहो आजचच उदाहरण घ्या जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटल मधील वार्ड क्रमांक सात मधील ऑक्सिजनचा पुरवठा अज्ञात इसमाने बंद केला. दरम्यान ऑक्सिजन बंद होताच दोन रुग्णांचा तडफडून तडफडून मृत्यू झाला. रुग्णांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे अश्रु पुसण्या ऐवजी तुमचा गीते त्यांच्यावर स्वार होऊ लागला. नातेवाइकांनी ऑक्सिजन बंद झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला तर ‘ना‘लायक गीतेने तुम्हीच ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला असा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाईकांवर करत माणुसकीलाच काळीमा फासला. आज संपूर्ण जिल्ह्याने तुमच्या गीते वरच्या प्रेमाने या दोन रुग्णांचा घेतलेला बळी उघड्या डोळ्याने पाहिला. डॉक्टर गीते व सुखदेव राठोड ची जोडी इतकी ताकतवर बनली आहे. डायरेक्ट यांनी यमदेवाला जिल्हा रुग्णालयात रेड कार्पेट अंथरली आहे. काल दुपारपासून तब्बल सोळा रुग्णांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. धनु भाऊ ही वेळ लोकांना मानसिक आधार देण्याची आहे. त्यांचे अश्रु पूसण्याची आहे. कमीत कमी साधन सामग्री चांगले आरोग्य सुविधा मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे पालक म्हणून ही जबाबदारी तुम्ही पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहात. पण सूर्यकांत गीते व सुखदेव राठोड सारख्या माणसामुळे येथील जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश शेवटी तुमच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लावणारा आहे. यासाठी या दोन्ही अधिकार्‍यांना घरी बसवा. जनतेचे जीव वाचवा अशी मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे. धनु भाऊ बूँद से गयी वो हौद से नही आती हे लक्षात घ्या व या दोघांचीही हाकालपट्टी करा अशी मागणी होऊ लागली आहे.

No comments:

Post a Comment