Saturday, April 17, 2021

*वारकरी सेवक - विश्वास महाराज पांडे*

परळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक श्री विश्वास महाराज पांडे, यांचे आज दुःखद निधन झाले. मुळात विश्वास पांडे हे एक हाडाचे पत्रकार होते. त्यांनी दैनिक मराठवाडा साथी या वर्तमानपत्रासाठी सलग ३० वर्ष काम केले,दै.मराठवाडा साथीचे त्या वेळेचे संपादक मा श्री मोहनलाल बियाणी यांचे अतिशय विश्वासू म्हणून,पांडे साहेब सर्वांना परिचित होते, स्वर्गीय मोहनलालजी बियाणी यांच्या पश्चातही बियाणी परिवार आणि दै मराठवाडा साथी परिवाराचा ते एक अविभाज्य भाग राहिले.स्तंभ लेखन,विषेशांक प्रकाशन, नैमित्तिक लेख आणि प्रासंगिक लेख लिहीण्यात त्यांचा हातखंडा होता.राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्राचा बारकाईने अभ्यास करून,ते लेखन करत असत, त्यांच्या जाण्याने परळी तालुक्यातील एका प्रतिभावंत जेष्ठ पत्रकाराची उणीव नक्कीच जाणवत राहणार आहे.
श्री विश्वास महाराज पांडे हे जसे हाडाचे पत्रकार होते तसेच ते जातिवंत वारकरी सुद्धा होते.अ भा वारकरी मंडळाचे ते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून काही काळ काम करत होते,तर सध्या ते परळी तालुका सचिव पदी कार्यरत होते.त्यांनी वारकरी संप्रदायीक कार्यक्रमाला भरभरून प्रसिद्धी मिळवून दिली.अ भा वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष श्री ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या सहाय्याने, विश्वास महाराज पांडे यांना वारकरी मंडळाच्या तालुक्याच्या कार्यकारणीवर कोकाटे महाराज यांनी पांडे महाराज यांना घेतल्यापासून ते आज तागायत कोकाटे महाराज  यांच्या सोबत वारकरी संप्रदायातील कार्य करण्याची संधी पांडे महाराज यांना कोकाटे महाराज यांच्या मुळे वारकरी संप्रदायाची गोडी  लागली नंतर ते दरवर्षी आषाढी  वारीची गोडी लागली   आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या सहभागाने विश्वास महाराज पांडे यांनी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराचे काम धडाडीने करूलागले दरवर्षी आषाढी सोहळ्यासाठी ते पायी चालत जात असत.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्र.११७ मध्ये व्याकरणाचार्य श्री ह भ प अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ते पायी वारी करत असत, त्यांची मुलगी यशोदा हिने सलग बारा वर्षे पालखी सोहळ्यात पायी वारी केली असुन, विश्वास महाराज पांडे यांनी संप्रदायावरील निष्ठेपायी, त्यांच्या मुलीचा विवाह दस्तापुर येथील श्री ह भ प बाळासाहेब महाराज कुलकर्णी यांच्या बरोबर लावुन दिला.बाळासाहेब महाराज आळंदी येथे रहात असल्यामुळे पांडे महाराज यांना वारंवार आळंदी दर्शनासाठी जाता आसत.मी स्वतः (श्री ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्त्री), आणि रामेश्वर महाराज कोकाटे . आम्ही दोघे नेहमीच विश्वास महाराज यांच्या संपर्कात असायचो, परळी तालुका आणि परिसरातील अखंड हरिनाम सप्ताह तथा धार्मिक कार्यक्रम आणि यात्रा उत्सव यांना भरभरून प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम पांडे महाराज करत असत, कीर्तनाची बातमी बनवण्यासाठी ते मुद्दाम खेड्यापाड्यात कीर्तन ऐकण्यासाठी जात असत, आणि मग कीर्तनकारांनी घेतलेल्या अभंग व त्यातील निरुपणाचा सारांश काढून बातम्या बनवत असत.अ भा मंडळाच्या शंभर शाखा-महिला आघाडी शंभर शाखा स्थापन करण्या पासून त्याला सर्वतोपरी प्रसिद्ध करण्या पर्यंत चे काम पांडे महाराज यांनी माझ्या समोर केले आहे.लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब विलासराव देशमुख जयसिंग गायकवाड  साहेबांपासुन आज घडीच्या सर्व राजकीय मंडळीशी पांडे महाराज यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. सर्व पत्रकार, संपादक आणि वृत्तपत्र निर्मीती मध्ये काम करणाऱ्या सर्वांचे ते लाडके आणि आदरणीय होते. विश्वास महाराज पांडे यांच्या जाण्याने, पत्रकारितेचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे,तर वारकरी संप्रदायाचा एक निष्ठावान वारकरी गमावल्याची भावना सर्व महाराज मंडळी बोलुन दाखवत आहेत, श्री विश्वास महाराज पांडे यांना सद्गती प्राप्त व्हावी एवढीच प्रभु वैद्यनाथ चरणी .
           ** शोकाकुल **
* श्री ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्ञी 
* रामेश्वर महाराज कोकाटे 
* विश्वाभर महाराज उखळीकर 
* श्री बाळासाहेब महाराज कुलकर्णी
व समस्त  वारकरी संप्रदाय परळी परिसराच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.

No comments:

Post a Comment