पालघर : (प्रतिनीधी) महामार्गावर रस्त्याच्या कडेला पीपीई किट (PPE Kit) घातलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे परिसरात पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
महामार्गाच्या कडेला काही अंतरावर मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. हा मृतदेह कोणाचा, मृत्यू नेमका कसा झाला, कारण काय हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
* बारामतीत बनावट रेमडेसिव्हीरमुळे मृत्यू
तिकडे बारामतीत बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे राज्यात खळबळ उडाली असताना बनावट औषध रुग्णांच्या जीवावर उठत असल्याचं समोर आलं आहे. बारामतीत दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, प्रशांत घरत आणि शंकर भिसे या चौघांनी बनावट रेमडिसीव्हर इंजेक्शन बनवून त्याची विक्री केली होती. बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचत या चौघांना अटक केली.

No comments:
Post a Comment