Friday, April 30, 2021

तज्ज्ञ म्हणतायत कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. आपण संकटाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री- उध्दव ठाकरे


VIDEO: तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित करण्यासाठी ठाकरे सरकारचा प्लॅन काय? वाचा सविस्तर

मुंबईः संपूर्ण जगात लाटांमागून लाटा येत आहेत. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट चौथी लाट झाली, किती लाटा येणार… पण सर्व काही आपल्या प्रयत्नांवर अवलंबून राहणार आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. आता तज्ज्ञ म्हणतायत, तिसरी लाटसुद्धा येणार आहे. मग आतापासून आपण संकटाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू केलेली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधलाय. त्यावेळी ते बोलत होते. पहिली लाट येऊन गेली, दुसरी लाट आपण अनुभवतो आहोत. ब्रिटननं दुसरी लाट अनुभवलेली आहे. तिसरी लाट येणार नाही, असं कोणी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. किंबहुना आता तज्ज्ञ म्हणातयात, तिसरी लाटसुद्धा येणार आहे. मग आतापासून आपण संकटाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू केलेली आहेत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

आपण ऑक्सिजन वाढतोय, त्याला 8 ते 15 दिवस लागतील. तिसरी लाट आली तरी त्यांचे गंभीर आणि घातक परिणाम महाराष्ट्रावर होऊ द्यायचे नाहीत. या निश्चयानं आपलं सरकार आता कंबर कसून मैदानात उतरलेलं आहे. तसंही ते आधीही उतरलेलं होतंच. दुसरी लाट येण्याची अपेक्षा होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल, अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. देशात कोणाचीच तशी तयारी नव्हती, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

…तर तिसऱ्या लाटेला थोपवल्याशिवाय राहणार नाही

तिसरी लाट आल्यानंतर निर्बंध लावण्याची आवश्यकता वाटली तरी देखील अर्थचक्र थांबता कामा नये. म्हणूनच गेल्या महिन्यात मी आपल्या राज्यातील प्रमुख उद्योजकांशी बोललेलो आहे. सर्व कामगार संघटनांच्या युनियन लिटर्सबरोबर बोललेलो आहे. त्यांनासुद्धा तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी काय करायला हवं, किंबहुना याचीसुद्धा मी त्यांना कल्पना दिलेली आहे. आपण सर्व थरावरती, सर्व पातळीवरती प्रयत्न करतोय. मला खात्री आहे, तिसरी लाट आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण थोपवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय.

कोविडची तिसरी लाट जरी आली तरी ऑक्सिजन कमी पडणार नाही

प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लाँट निर्माण करण्याच्या सूचना दिल्यात. ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या किंबहुना पुरवणाऱ्या प्लांटची निर्मिती करा, असं सांगितलेलं आहे. त्यानुसार टेंडर काढलेली आहेत. खरेदी सुरू झालेली आहेत. त्या सगळ्या प्रक्रियेला 10 ते 15 दिवस लागतील. येत्या काही दिवसांत हे सगळे प्लांट सुरू होतील. कोविडची तिसरी लाट जरी आली तरी ऑक्सिजन कमी पडणार नाही. ही तयारी आपण केलेली आहेत. त्याचं फळ त्यावेळेला नक्की मिळेल. रोज पावणे तीन लाख चाचण्या करतोय. आणखी 3 लाखांच्या वरती आपण जाणार आहोत. यात 60 ते 70 आरटीपीसीआर आणि उरलेला रॅपिड अँटिजन टेस्ट आहेत. आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलंय.

No comments:

Post a Comment