Tuesday, April 27, 2021

पुढील 48 तासात मुसळधार पाऊसाची शक्यता. हावामान खात्याचा सर्तर्कतेचा इशारा .

मुंबई : देशभरासह महाराष्ट्रातही उष्णता वाढली आहे. मात्र वाढत्या उष्णतेदरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात येत्या 48 तासात मध्य, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, अनेक ठिकाणी वादळी वाराही राहण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

वाढलेल्या उष्म्यामुळे वातावरणात अनपेक्षित बदल झाला असून या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिलाय. मात्र शेतपिकाच्या नुकसानीची धास्ती वाढली आहे. देशात इतर काही राज्यांतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. बळीराजाला या अवकाळी फटका बसू शकतो. यामध्ये उन्हाळी कडधान्य, बाजरी, भूईमुग आणि भाजीपाल्याचे नुकसान होऊ शकते. 

दरम्यान, उत्तराखंड, आसाम, मेघालय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोवा, तेलंगणा, केरळ तसेच माहे आणि जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालमधील मैदानी क्षेत्र, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, रायलसीमा, दक्षिणेकडील आंतरिक कर्नाटक आणि तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये वाऱ्यासह वादळ येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment