पुणे (प्रतिनीधी) कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील एका वैद्यकीय चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेच्या नावाने आरोपींनी बनावट अहवाल दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रेमडेसिवीरच्या काळ्याबाजारा नंतर बनावट रिपोर्ट देणाऱ्यांचे रॅकेट समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सागर अशोक हांडे (वय २५, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी, संगम चौकाजवळ, मूळ रा. द्रावणकोळा, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि दयानंद भीमराव खराटे (वय २१, सध्या रा. गणपती माथा, वारजे माळवाडी, मूळ रा. भोगजी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत जंगली महाराज रस्ता परिसरातील प्रयागेशाळेच्या व्यवस्थापकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जंगली महाराज रस्त्यावरील एका प्रयोगशाळेच्या नावाने कोरोना चाचणीचे बनावट अहवाल तयार करून हांडे आणि खराटे यांच्याकडून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलिधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब झरेकर यांच्या पथकाने दोघांना सापळा रचून अटक केली