राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईसह राज्यातील रक्तसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना संपूर्ण माहिती दिली.

मी आज मुंबई आणि राज्यात  इतर ठिकाणाच्या ब्लड बँकांची माहिती घेतली. पुढील सहा ते सात दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या आहे, राज्यात कोरोना सुरू झाल्यापासून रक्त पुरवठा कमी झाला आहे' अशी माहिती शिंगणे यांनी दिली. तसंच, रक्तसाठा कमी होत असल्यामुळे आम्ही वेळोवेळी लोकांना आवाहन केले आहे, नियमित रक्तदात्यांनी रक्तदानाचे शिबिर आयोजित करावे. राजकीय नेत्यांनीही त्यांचे वाढदिवस साजरा होत असताना रक्तदान शिबिर आयोजित करावे, असं आवाहनही शिंगणे यांनी केले आहे.