Sunday, February 4, 2024

जयभिम महोत्सवातून शिल्लक राहिलेल्या रक्कमेचा योग्य व अभिनंदनीय विनियोग बीड शहरात साकारणार भव्यदिव्य बुद्ध सृष्टी आणि अभ्यास केंद्र.

बीड (प्रतिनिधी) बीडच्या जयभिम महोत्सवाने राज्यात एक लौकिक आदर्श मिळविला आहे. हा महोत्सव समाजाच्या धम्म दानातून साजरा होतो.त्यामुळे एक आगळी-वेगळी ओळख बीड जयभिम महोत्सवाने निर्माण केली आहे. दरम्यान जयभिम महोत्सवातून शिल्लक राहिलेल्या रक्कमेतून आता बीड शहरात भव्यदिव्य बुद्धसृष्टी आणि स्टडीसेंटर उभारले जाणार आहे. असा निर्णय समाज बांधवांनी घेतला आहे.
बीड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून बैठक असयोजित करण्यात आली होती. सदरील बैठक युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अमरसिंग ढाका होते. सदरील बैठक अरुण भोले, अजय सवाई, बबन वडमारे, राजू जोगदंड यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत शीतलकुमार सुकाळे, संतोष जाधव यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची शिल्लक असलेली रक्कम यावर चर्चा झाली. त्या रकमेचा विनियोग कसा करायचा बैठकीत ठरले. त्यासाठी 15 लोकांची एक समिती स्थापन करण्यात आली. जयंतीची उर्वरित 11 लाख रुपये रक्कमेचे नियोजन करण्यात आलं. या बैठकीत अनेक सूचना आल्या परंतु सर्वानुमते बीड शहरामध्ये एक भव्य अशी बुद्धसृष्टी निर्माण करण्यासाठी एकमत झालं. त्यासाठी पालवन चौक येथील नागसेनवन बौद्ध विहार हे निवडण्यात आले. त्यासाठी नऊ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. उरलेल्या दोन लाखांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सर्कल उभा करण्याचा मानस केला. यामध्ये स्टडी सर्कलसाठी दोन लाख रुपये देण्याचे सर्वानुमते ठरले.बीडमध्ये बौद्ध सृष्टी निर्माण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये भगवान कांडेकर, प्रशांत वासनिक, प्रा. अशोक गायकवाड, विजय भालेराव, अरुणाताई आठवले, संतोष जाधव,  शीतलकुमार सुकाळे यांची समिती स्थापन करण्यात आली. या बैठकीला आशोक ठोकळ, प्रा. बाळासाहेब गव्हाणे, अविनाश जोगदंड , नगरसेवक अमोल पौळ, अड.श्रीकांत साबळे, सुमेध जोगदंड, प्रा. अशोक गायकवाड ,सिद्धार्थ कुडुक ,जे दे आबा ,समाधान जाधव ,राम प्रधान ,बंडू निसर्गन,कल्याण डोंगरे, प्रणित सरवदे,लखन वडमारे, प्रताप ध अनवे,गौतम कांबळे , मिसळे आप्पा ,अक्षय कोकाटे ,लक्ष्मण गलांडे ,उमेश तुळवे ,वीर पुरुषोत्तम, मनोज मस्के प्रा. सनी वाघमारे अनुराधा वीर, उमाजी वाघमारे ,रणजीत शिनगारे ,बाबासाहेब ओहाळ, अड. संगीता वीर, अड. विद्या गायकवाड ,राऊत विजय भालेराव, भोले जीएम, गालफाडे राजेंद्र ,कॅप्टन राजाभाऊ आठवले, तांगडे भानुदास, अड. राजेश शिंदे, मल्हारी जाधव ,पत्रकार सुनील डोंगरे ,कपिल सोनवणे ,अड. तेजस वडमारे ,प्रकाश खंदारे, तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment