बीड (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नराधमाविरूध्द बलात्कारासह अॅ ट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार बीडच्या एका प्रसिध्द हॉटेल, लॉजवर घडल्याने खळबळ उडाली आहे.
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका 22 बर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरूणाने मित्राच्या रूमवर व बीड शहरातील एका प्रसिध्द हॉटेल, लॉजवर नेवून अत्याचार केला. त्यानंतर पिडितेने लग्नाविषयी विचारले असता मारहाण करून शिवीगाळ करत तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार काल रात्री उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आभिषेक पंजाब शिंदे रा. शिवणी ता. बीड याच्याविरूध्द कलम 376 (2) (एन), 323, 504, 506 भांदवीसह कलम 3 (1) (आर) (एस) (डब्ल्यू) अनुसूचित जाती जमाती अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास डीवायएसपी गोल्डे करत आहेत.
No comments:
Post a Comment