Wednesday, February 7, 2024

पवनराजे अर्बन निधी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांची आत्महत्या.

*पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्यांच्या खिशात कागदपत्रे सापडले आहेत. यातून नेमकं कारण पुढे येण्याची शक्यता आहे. परळी पोलीस पुढील तपास करत आहे.

परळी वैजनाथ ( प्रतिनिधी)  बीड जिल्ह्यातील परळी येथे असलेल्या पवनराजे अर्बन निधी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली. दरम्यान बँक घोटाळ्याने गाजत असणाऱ्या बीड जिल्ह्यात एका पतसंस्थेच्या अध्यक्षाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. 
प्रल्हाद सावंत यांची परळी शहरात पवनराजे अर्बन निधी ही पतसंस्था आहे. त्यांनी रात्री आत्महत्या केल्याचं उघडकीस आले आहे. परळी शहरातील प्रेम प्रज्ञा नगर येथील एका अपॉर्टमेंटमध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसापूर्वीच घर खरेदी केले होते.

या घरात अद्याप ते राहयलाही गेले नव्हते. याच घरात त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्यांच्या खिशात कागदपत्रे सापडले आहेत. यातून आत्महत्येचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. परळी पोलीस पुढील तपास करत आहे.


No comments:

Post a Comment