Tuesday, February 13, 2024

मध्यरात्री घरफोडी ची घटना शेजारी राहणाऱ्या दोघांची घरे फोडली. सोने, रोकड लंपास .


सिरसाळा (प्रतिनिधी) : धारूर तालुक्यातील आमला येथे मंगळवारी मध्यरात्री घरफोडीची घटना घडली.चोरट्यांनी दोन घरांतून पाच तोळे सोने व पन्नास हजार रुपये नगदी चोरट्यांनी चोरी करत पोबारा केला. मंगळवारी सकाळी सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

अधिकृत माहिती अशी की आमला येथील अशोक शिवाजी सोळंके व किसन जगन्नाथ सोळंके हे एकमेकांच्या शेजारी राहतात. सोमवारी रात्री सहकुटुंब जेवण करून दोन्ही कुटुंबीय झोपले होते. मंगळवारी पहाटे अडीज वाजेच्या सुमारास काही चोरट्यांनी अशोक सोळंके यांच्या घराचे कुलूप तोडत आत प्रवेश केला. अशोक सोळंके यांच्या घरातून तीन तोळे सोने व पन्नास हजार रुपये नगदी तर किसन सोळंके यांच्या घरातील दोन तोळे सोने यावर चोरट्यांनी डल्ला मारला.

घरातील महिलांना जाग आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लागलीच आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी तेथून पोबारा केला. दरम्यान, सिरसाळा पोलिसांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी श्वान पथकासह भेट देत पंचनामा केला असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.

No comments:

Post a Comment