माजलगाव (प्रतिनिधी) ऊसतोड व्यवहाराच्या कारणावरून एका २८ वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. दरम्यान या महिलेला डांबून ठेवण्यात आल्याची घटना दि.२२ ते २४ फेब्रुवारीच्या दरम्यान घडली. सदरील प्रकरणी २६ फेब्रुवारी रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एका मुख्य आरोपीसह इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाडीत टाका. दोघांना गाडीत टाकून नेऊन अशोक रामभाऊ जाधवर याने फिर्यादीस कळंबच्या पुढे नेऊन आडरानात बळजबरीने अत्याचार केला. सोबत असणाऱ्या इतर पाच जणांनी फिर्यादीसह तिच्या पतीस पंचगंगा कारखाना इचलकरंजी कोल्हापूर येथे नेऊन बळजबरीने डांबून ठेवले व मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान पिडीत महिलेच्या फिर्यादी वरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी अशोक रामभाऊ जाधवर याच्यासह इतर पाच जणांविरुद्ध कलम ३७६ (१) ,३६५, ३४१,३४३,१४३, १४९, ५०४,५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment