Saturday, February 24, 2024

दुर्दैवी घटना!डोक्याला बांधलेले स्कार्फ सुटून मळणी यंत्रात अडकले. मळणी यंत्राने महिलेला खेचून घेत मुंडके धडा वेगळे.


पाटोदा (प्रतिनिधी) सध्या ज्वारी काढणीला वेग आला असून ज्वारीचे खळे करताना एका महिलेच्या डोक्याला बांधलेले स्कार्फ सुटून मळणी यंत्रात अडकले. मळणी यंत्राने महिलेला खेचून घेत तिचे मुंडके धडा वेगळे केल्याची घटना पाटोदा तालुक्यातील डोमरी येथे गुरुवारी घडली.

अंजना श्रीधर जगताप वय 55 वर्ष असं अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी व मळणी सुरू आहे. उन्हाचा कडाका वाढला असून उन्हापासून व धूळीपासून संरक्षण व्हावे यासाठी डोक्याला स्कार्फ,रुमाल बांधला जात आहे.त्यातच दुर्घटना देखील घडत आहेत.डोमरी येथील अंजना जगताप ही महिला यंत्राच्या साह्याने मळणी करत होती.डोक्याचा स्कार्फ अचानक निसटल्याने स्कार्फ मळणी यंत्राचा अडकला. मशीनला प्रचंड वेग असल्यामुळे यंत्राने अंजना जगताप यांना खेचून घेतले. काही समजण्याच्या आत त्यांचे मूंडके धडा वेगळे झाले गेले.यानंतर घटनास्थळी जमलेल्या नातेवाईकांनी आक्रोश केला. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a Comment