बीड (प्रतिनिधी) भाजीपाल्याच्या पोत्यातू न देशी विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एका पांढऱ्या ऍक्टिवा स्कुटीवर दारूचा बॉक्स पोत्यामध्ये लपवून विक्रीसाठी आणणार होता. पोलिसांनी सापळा रचून आरोपी गणेश येडे वय-30 वर्षे रा.चौसाळा यास ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याने सुरुवातीला पोत्यात भाजीपाला असल्याचे सांगितले. मात्र झाडाझाडतीनंतर यात विदेशी- देशी दारूचा मोठा साठा आढळून आला. दरम्यान या कारवाईत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, आणि अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सपोनी बाबासाहेब राठोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, जयसिंग वायकर, सुशील पवार,सय्यद अशपाक, मनोज परजणे, यांनी केली.
No comments:
Post a Comment