Sunday, February 4, 2024

श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे प्रणेते.प्रखर हिंदुत्ववादी राजकारणातील भीष्म लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न.


नवी दिल्ली — राजकारणातले निष्कलंक व्यक्तिमत्व व हिंदुत्ववादी राजकारणाचे भीष्म, श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे प्रणेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहिर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या घोषणेची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ‘एक्स’ समाजमाध्यमावर भाजपचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी भारतरत्न सन्मान देत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांसह देशभरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात येणार असून ही अतिशय आनंददायी घटना आहे. लालकृष्ण आडवाणी यांच्याशी संवाद साधून आपण त्यांचे अभिनंदन केले आहे. देशातील अतिशय ज्येष्ठ राजकारण्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचे भारताच्या विकासामध्ये अतुलनीय योगदान आहे. तळागाळातून सामाजिक कार्यास सुरूवात करून त्यांनी देशाचे उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यांची संसदीय कारकीर्द ही आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे.आडवाणी यांचे सार्वजनि जीवन पारदर्शकता आणि सचोटीचा आदर्श असल्याचे पंतप्रधांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, लालकृष्ण आडवाणी यांनी राजकारणातील नैतिकतेचा अनुकरणीय असा मानक स्थापित केला आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत. त्यांना भारतरत्न प्रदान करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अगणित संधी मला मिळाल्या हा मी नेहमीच माझा बहुमान मानतो, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment