Friday, February 9, 2024

दर्श मौनी अमावस्या निमित्त जागृत देवस्थान बजरंगबली वेताळ मंदिरात भाविकांनी केली दर्शनासाठी गर्दी.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  येथील श्री वैजनाथ मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेले जागृत देवस्थान श्री बजरंग बली वेताळ मंदिरात माऊली दर्शन अमावस्या निमित्त आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते.   नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या परळी वैजनाथ येथील  जागृत देवस्थान श्री बजरंग बली वेताळ मंदिरात दर्शनासाठी  गर्दी केली होती.
 दरम्यान अमावस्या निमित्त श्री बजरंग बली वेताळ मंदिरात आज शुक्रवारी पहाटे  पाच वाजता पूजा, तसेच धार्मिक विधी आणि महाआरती मंदिराचे महंत श्री विलासनंदजी महाराज यांच्या शुभहस्ते कार्यक्रम पार पडले.  अमावस्या निमित्त परळी वैजनाथ येथे श्री बजरंग बली वेताळ च्या दर्शनासाठी शहर व पंचक्रोशीतून भाविक भक्त दाखल झाले होते.

No comments:

Post a Comment