बीड (प्रतिनिधी) एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आदर्श गणेश नगरमध्ये घडली आहे.या तरुणाने 30 एप्रिल रोजी झालेल्या एमपीएससीची परीक्षा दिली होती.
अक्षय अप्पा पवार असं आत्महत्या करणाऱ्या या विद्यार्थ्यांचं नाव आहे. दरम्यान याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.आदर्श गणेश नगरमध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अप्पा पवार असं या विद्यार्थ्यांचं नाव असून, तो मूळचा माजलगाव तालुक्यातील राजेवाडी गावचा रहिवासी आहे. अक्षय हा गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एमपीएससीची तयारी करत होता. दरम्यान 30 एप्रिल रोजी झालेल्या एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी तो बीडमध्ये आला होता.तर परीक्षा दिल्यावर त्याला पेपर अवघड गेला होता. त्यामुळे तो चिंतेत होता. तसेच रविवारी परीक्षा दिल्यानंतर तो बीड शहरातील आदर्श गणेश नगरमध्ये त्याच्या मित्राच्या खोलीवर मुक्कामासाठी थांबला होता. पण एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने त्याने मित्राच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर याबाबत मयत अक्षयच्या कुटुंबातील सदस्यांना पोलिसांनी फोनवरून माहिती दिली आहे.
No comments:
Post a Comment