Tuesday, May 2, 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ.देवानंद शिंदे यांची प्रा.डॉ.विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सन्माननीय सदस्य डॉ.देवानंद शिंदे यांनी नुकतीच सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ.विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी देशमुख परिवाराच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

परळी वैजनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ.विजयकुमार देशमुख यांच्या गणेशपार रोडवरील गुलमोहर या निवासस्थानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ.देवानंद शिंदे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य मधुकर गायकवाड, डॉ.मधुसूदन काळे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी श्री विजयकुमार देशमुख, श्री कवडे व डॉ.मधुसूदन काळे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी प्रा.बाबासाहेब देशमुख, मुख्याध्यापक चव्हाण, प्रा.माणिक मुंडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment