साई सयाजीराव सौंदर वय 15 असं मयत मुलाचे नाव आहे. पुंगणी येथील साई सौंदर हा त्याच्या मित्रांसह त्याच्याच शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. पण त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
दरम्यान या प्रकरणी बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment