Thursday, May 4, 2023

परळी वैजनाथ येथे वारकरी मुला मुलींचे भव्य दिव्य बाल संस्कार शिबीर.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थे तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि. 1 मे 2023 ते 01 जून 2023 पर्यंत वारकरी मुला मुलींचे भव्य दिव्य बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरा मध्ये महाराष्ट्रातुन मुल मुंली वारकरी संप्रदायाचे शिक्षण  घेत आहेत. महाराष्ट्रातील अनेक महाराज मंडळी चे मोलाचे मार्गदर्शन  करत असतात सद्याच्या काळात मुल मुंली हे  व्यसनामध्ये गुंतत जात आहेत हे लक्षात घेऊन अनेक मंडळींच्या  सहकार्याने व श्री.ह.भ.प रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या मार्गदर्शनाने श्री.ह.भ.प. भागवताचार्य गोविंद महाराज मुंडे यांनी आपल्या कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थे तर्फे भव्य दिव्य  बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .या शिबीरा मध्ये वारकरी भजन, किर्तन, हरिपाठ, ज्ञानेश्वरीवरील चिंतन, तुकाराम महाराज गाथा, हार्मोनियम, पखवाज, तबला व शालेय शिक्षण शिकवले जात आहे तरी आपल्या मुला मुलींना सु-संस्कारीत बनवण्या करीता ईच्छूक पालकांनी संपर्क साधावा प्रवेश देणे सुरू आहे.
संपर्क श्री.ह.भ.प. भागवताचार्य गोविंद महाराज मुंडे परळी मो. 9765772748
श्री.ह.भ.प. वेदांताचार्य मारोती महाराज कोंडाळ मो. 8265052659
श्री.ह.भ.प. करण कुमार म. मुंडे  मो. 9529767588
श्री.ह.भ.प. भागवताचार्य राम महाराज मुंडे मो. 9527438282
श्री.ह.भ.प जनक महाराज कदम मो. 9284700054
श्री.ह.भ.प. अशोक म. कराळे मो. 9881438629 या नंबरवर संपर्क करावा

No comments:

Post a Comment