Wednesday, May 3, 2023

पवनराजे मल्टीपर्पज अर्बन बँकेच्या वतीने दत्ताभाऊ देशमुख व नागनाथ कराड यांचा सत्कार संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रेणापुर जि.लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल जेष्ठ नेते नागनाथराव कराड व परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यपदी दत्ताभाऊ  देशमुख यांची निवड झाल्याबद्दल पवनराजे अर्बन बँकेच्या वतीने आज मंगळवार दि.2 मे रोजी त्यांचा सत्कार करतांना अध्यक्ष प्रल्हाद रंगनाथराव सावंत, सचिव गोविंद दिलीपराव भरबडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
आज मंगळवारी पवनराजे अर्बन मल्टीपर्पज अर्बन निधी बँकेत जेष्ठ नेते दत्ताभाऊ देशमुख व नागनाथ कराड यांची अनुक्रमे परळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदी व रेणापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगच्छ देवून सत्कार करण्यात आला
यावेळी पवनराजे अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद रंगनाथराव सावंत, सचिव गोविंद दिलीपराव भरबडे यांच्यासह सहसचिव प्रल्हाद काळे,संचालक बालासाहेब घवले,संदिप तिळकरी सर,जेष्ठ मार्गदर्शक प्रा.गोपीकृष्ण सारडा सर,प्रभाकर चव्हाण, कार्यालयीन कर्मचारी,अमर सुर्यवंशी,नितिन खलते,सुजाता पवार, आदी
 उपस्थित होते.

No comments:

Post a Comment