बीड (प्रतिनिधी )-"केरळ स्टोरी" नावाचा चित्रपटाच्या वेळी चित्रपट गृहात बेकायदेशीर मंडळी जमवून प्रक्षोभक व आपत्तीजनक भाषणे करायला परवानगी देऊन महाराष्ट्र सिनेमास रूल्स, १९९६ व सर्वोच न्यायालयाचा Writ Petition (Civil) No. 943/2021; 28-04-2023 आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित चित्रपट गृहांचे परवाने रद्द करावे व सर्व चित्रपट गृहांना असे बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याच्या सुचना देण्यात यावे. संदर्भ: १. Maharashtra Cinemas (Regulation) Rules, 1966, Rule 125. २. मा. सर्वोच न्यायालय यांचे आदेश मराठवाडयात असलेल्या चित्रपट गृहात (नांदेड व इतर ठिकाणी) केरळ स्टोरी नावाच्या विवादित चित्रपटाच्या प्रदर्शन करीता मोठा जमाव जमा करून काही समाज कंटकांनी चित्रपट सुरु होण्याचा अगोदर व काही ठिकाणी नंतर बेकायदेशीरपणे प्रक्षोभक भाषणे व हिंदुएत्तर समाजाच्या आर्थिक व सामाजिक बहिष्कार करण्यासारखे भडकाऊ भाषणे केली आहे
. अश्या प्रकरणां मध्ये मा. सर्वोच न्यायालय तर्फे प्रत्येक राज्याला असे आदेश देण्यात आले होते कि कोणी हि तक्रारदाराची वाट ना बघता पोलीस प्रशासनाने स्वतः तक्रार दाखल करून कारवाई करावी, पण प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही हे सर्वोच्च न्यायलयाची अवमानना होत आहे.
चित्रपट गृहाला परवाना देतांना वर लिखित व नमूद असलेल्या कायद्यानुसार चित्रपट गृह चित्रपट प्रसारणा व्यतिरिक्त इतर कोणत्याही उपयोगासाठी आणता येत नाही इथे परवाना अटींचे उल्लंघन झाले आहे. यामुळे नांदेडच्या पिव्हीआर मल्टिफ्लेक्स सहीत ज्या ज्या ठिकाणी केरला स्टोरी चित्रपट प्रसारणा पुर्वी अथवा नंतर जमाव जमवून बेकायदा रित्या प्रक्षोभक भाषणे करण्यात आली त्या आयोजकांवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी.
या सोबतच आपणांस विनंती आहे कि मराठवाड्याच्या विविध ठिकाणी केरल स्टोरी चित्रपटाच्या विशेष आयोजन करण्यात आले होते त्यांची चौकशी करावी व संबंधित चित्रपट गृह/मल्टि प्लेक्स वर तात्काळ कारवाई करुन त्यांचे परवाने रद्य करण्यात यावे तसेच औरंगाबाद विभागांतर्गत येणा-या सर्व चित्रपट गृहांना असे बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याच्या अन्यथा परवाना रद्य करण्याच्या कडक सुचना देण्यात यावे. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास व मा. उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी स्वतंत्र आहोत. यावेळी शिष्टमंडळात अशोक हिंगे( मराठवाडा अध्यक्ष )फारूक अहेमद,( प्रदेश प्रवक्ते )सिद्धार्थ मोकळे( प्रदेश उपाध्यक्ष )महेश निनाळे( विभागीय महासचिव )जितेंद्र सिरसाठ( विभागीय कार्यक्रम प्रमुख ) आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment