*'कला, गुण, छंदाचे महत्त्व' या विषयावर व्याख्यान तसेच ज्येष्ठ कलावंत सुधीर कोर्टीकर यांचे दुर्मीळ नाण्यांचे, टपाल तिकिटांचे प्रदर्शन.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दैनिक मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व. मोहनलालजी बियाणी (काकाजी)यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे दहावे पुष्प छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ कलावंत सुधीर कोर्टीकर हे हे ''कला, गुण, छंदाचे महत्व' या विषयावर गुंफणार आहेत. शुक्रवार, दि. २६ मे रोजी सायं. ५.३० वाजता कै.नारायणराव उजळंबकर वाचनालय सिडको एन-४ संभाजीनगर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राचार्या सौ. सुनीता चंद्रशेखर पाठक यांच्या हस्ते होणार आहे.
यानिमित्ताने प्रसिद्ध नाणे, टपाल तिकिट संग्राहक हे मुलांसाठी दुर्मीळ नाण्यांचे आणि टपाल तिकिटांचे प्रदर्शन आयोिजत करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेनुसार या वर्षीपासून स्व. मोहनलालजी बियाणी (काकाजी) यांच्या स्मृत्यर्थ मासिक व्याख्यानमाला आरंभ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व बंसल क्लासेसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक ज्येष्ठ सिनेपत्रकार अशोक उजळंबकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष डाॅ. प्रभू गोरे यांच्यासह कार्यकारिणीने केले आहे. अिधकाधिक मुलांनी याचा लाभ घ्यावा.
No comments:
Post a Comment