Thursday, May 4, 2023

कलेक्टर ऑफिसातील सर्व AC बंद, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचा अनोखा निर्णय.

बीड  (प्रतिनिधी) बीडच्या  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक अनोखा निर्णय घेतला आहे. कलेक्टर ऑफिसमधील कोणत्याच डिपार्टमेंटमध्ये एसी लावला जाणार नाही, असा मोठा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातही चर्चेला तोंड फुटलं आहे
बीड जिल्ह्याचा चार्ज घेतल्यानंतर पहिला निर्णय त्यांनी स्वतःच्या केबिनपासून सुरु केला. तो निर्णय म्हणजे केबिनमध्ये कसल्याही पद्धतीने एसीची हवा येता कामा नये. त्यांच्या केबिनमधील दरवाजे खिडक्या नेहमी उघड्या असाव्यात. त्यानंतर व्हीआयपी गाडीलाही एसी नसावा, त्या गाडीच्या काचाही उघड्याच असाव्यात
त्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असलेला एसी बंद करण्यास दीपा मुधोळकर यांनी सांगितले आहे. फक्त फॅन आणि खिडकीतून येणारी नैसर्गिक हवा असावी, असा त्यांचा आदेश असल्यामुळे ऐन उन्हाळ्यातही खुद्द जिल्हाधिकाऱ्यांसह कार्यालयातील कुठल्याच विभागात वातानुकूलन यंत्रणा सुरु नाही.

No comments:

Post a Comment