*ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रवक्ते ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के; कलशपुजन ह.भ.प.कांतादेव महाराज वडगावकर यांच्या हस्ते होणार.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे मिरवट येथे गुरुवार दिनांक 27 एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच कलशारोहणाच्या कार्यक्रमाची सांगता बुधवार दिनांक 3 मे रोजी होणार असून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ प्रमुख श्री ह भ प नारायण महाराज बारटक्के यांच्या रसाळ व ओजस्वी वाणीतून होत असून गाथा भजन प्रमुख सोपान महाराज गवळी नसगाव जालना हे आहेत तसेच कलश पूजन श्री ह भ प कांतादेव महाराज वडगावकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास परळी व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मिरवट ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
परळीपासून जवळच असलेल्या मौजे मिरवट येथे गुरुवार दिनांक 27 एप्रिल ते बुधवार दिनांक 3 मे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कलशारोहणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उद्या बुधवार दिनांक 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कलश स्थापनेचे कीर्तन ह भ प शिवाजी महाराज बोकारे पूर्णा यांचे होणार असून दुपारी 1 ते 1 वाजता श्री गुरु सोपानकाका संस्थान परळी येथील ह भ प भागवताचार्य विठ्ठल महाराज उखळीकर यांचे कीर्तन होणार आहे तसेच रात्री नऊ ते अकरा वाजता ह भ प मधुकर महाराज सायाळकर यांचे कीर्तन होईल. या धार्मिक कार्यक्रमास पंचक्रोशीतील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य तसेच भाविक भक्तांनी या ज्ञानामृत व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई मित्र मंडळ मिरवट व समस्त गावकरी मंडळ मिरवट यांनी केले आहे.
दररोज पहाटे चार ते पाच काकडा आरती, सहा ते सात विष्णू सहस्त्रनाम ,सकाळी सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 11 ते तुकाराम गाथा भजन, दुपारी दोन ते चार भावार्थ रामायण, दुपारी चार ते पाच राम कृष्ण हरी जप, सायंकाळी 6 ते 7.30 वाजता धुपारती रात्री नऊ ते 11 हरिकीर्तन तसेच बारा ते चार हरीजागर असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत.
दरम्यान 27 एप्रिल रोजी ह भ प भागवताचार्य दत्ता महाराज बोर्डीकर बोंदरगाव व शुक्रवार दिनांक 28 एप्रिल रोजी ह भ प वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज झोलकर भिसेगाव यांचे हरिजागर संपन्न झाले. उद्या शनिवार दिनांक 29 एप्रिल रोजी ह भ प भागवताचार्य वैजनाथ महाराज थोरात वडगाव दादाहरी, 30 एप्रिल रोजी ह भ प भागवताचार्य संतोष महाराज वनवे बीड, 1 मे रोजी ह भ प विश्वंभर महाराज उखळीकर, 2 मे रोजी ह भ प भागवताचार्य रूपालीताई सवणे यांचे किर्तन संपन्न झाले.
No comments:
Post a Comment