Saturday, May 13, 2023

श्रीमती भागिरथीबाई आरगडे यांचे निधन शिक्षक विलास आरगडे यांना मातृशोक.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  श्रीमती भागिरथीबाई सोपानराव आरगडे रा.पांगरी ता.परळी वैजनाथ यांचे आज शुक्रवार दि.12 मे रोजी दुपारी 2.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 80 वर्ष वयाच्या होत्या. महर्षी कणाद विद्यालयातील शिक्षक विलास आरगडे यांच्या त्या मातोश्री होत.
श्रीमती भागिरथीबाई आरगडे यांचे आज पांगरी येथे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. धार्मीक व कौटूंबिक कार्यक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग होता. आज पांगरी येथे श्रीमती भागिरथीबाई आरगडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आरगडे कुटूंबियाच्या दुःखात दैनिक कांतीकारी साथी.परिवार सहभागी आहे.

No comments:

Post a Comment